शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाच

By admin | Updated: October 26, 2016 01:19 IST

उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. उरी येथे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला

गुजरनवाला : उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. उरी येथे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातील एका दहशतवाद्यासाठी लष्कर-ए-तोयबाने विशेष नमाज पठण करण्याचे ठरवले आहे. तशी पोस्टर्स पाकिस्तानातील गुजरनवाला भागात लावण्यात आली आहेत.हीे पोस्टर्स म्हणजे उरी दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. पाकिस्तान आतापर्यंत उरी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत आला आहे. त्याबाबतचे सर्व आरोप पाकने फेटाळले आहेत. उरीवर हल्ला करणाऱ्या एकाचे नाव मोहम्मद अनस उर्फ अबू सिराका असे आहे. तो गुजरनवालाचा रहिवासी होता. लष्कर-ए-तोयबाच्या या दहशतवाद्यासाठी विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात स्थानिक रहिवाशांना सहभागी होण्याचे आवाहन पोस्टर्समार्फत करण्यात आले आहे. अबू सिराकाने १७७ हिंदू सैनिकांचा खात्मा केला, असा खोटा प्रचार या पोस्टर्समधून करण्यात येत आहे. लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफीझ सईदचे छायाचित्रही पोस्टर्सवर झळकत आहेत. (वृत्तसंस्था)दहशतवादाची कर्मभूमी दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पाकला फटकारले आहे. जीनिव्हात झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय संघटनेच्या बैठकीत भारताने सोमवारी पाकिस्तानच्या नावाचा थेट उल्लेख करून, तो देशच दहशतवादीची कर्मभूमी बनल्याचा टोला लगावला. बैठकीत पाकने काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताच, भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे आणि पाकिस्तान अशा दहशतवादासाठी कर्मभूमी आहे, असे टीकास्त्र भारताने सोडले. गोव्यातील ब्रिक्स परिषदेतही भारताने पाकचा दहशतवादाची जननी असा उल्लेख केला होता. या परिषदेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाचा हवाला देत काश्मीर प्रश्न उपस्थित केला. त्यावर पाकिस्तानने या ठरावातील उल्लेखानुसार सर्वात आधी पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा, अशी मागणी भारताने केली.