शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांचा प्रताप, चक्क जिल्हाधिका-यांचे घर, रेल्वे प्लॅटफॉर्मही विकले

By admin | Updated: July 16, 2015 20:47 IST

उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे भूमाफियांनी उच्छाद घातला असून या भूमाफियांनी आता चक्क रेल्वेचे प्लॅटफॉर्म, जिल्हाधिका-यांचे घर, शाळा, कृषी कार्यालयाचीही विक्री केल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुजफ्फरनगर, दि. १६ - उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे भूमाफियांनी उच्छाद घातला असून या भूमाफियांनी आता चक्क रेल्वेचे प्लॅटफॉर्म, जिल्हाधिका-यांचे घर, शाळा, कृषी कार्यालयाचीही विक्री केल्याचे उघड झाले आहे. या सरकारी मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात  पोहोचल्याचा अंदाज असून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे. 
बंटी और बबली या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच मुजफ्फरनगरमधील भूमाफियांनी अक्षऱश: उच्छाद घातला आहे. या भूमाफियांनी जिल्हाधिका-यांचे घरच विकून दिले. ज्या मंडळींनी हे घर घेतले ती मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली व हा सर्व प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिका-यांचे घर विकत घेतल्याचे सर्व पुरावेही त्यांनी सरकारी यंत्रणेसमोर सादर केले आहेत. भूमाफियांनी २००३ मध्ये काही सरकारी मालमत्तेची विक्री केली असून यात जिल्हाधिका-यांच्या घरासोबतच रेल्वे प्लॅटफॉर्म, रस्ता, शाळा, सरकारी कार्यालयांचीही विक्री केल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशमधील महसूल खात्याच्या सचिवांनी स्थानिक तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.