शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन पारित करणारच

By admin | Updated: May 27, 2015 23:59 IST

भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील,

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील, असे स्पष्ट करून भूसंपादन विधेयकासोबतच जीएसटी विधेयक संसदेत पारित करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.‘गाव, गरीब आणि शेतकरी यांना अनुकूल असलेल्या सूचना आल्या आणि त्या राष्ट्राच्या हिताच्या असल्या तर आम्ही लगेच त्या स्वीकृत करू,’ असे मोदी यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. भूसंपादन विधेयकावरील कोंडी कायम असल्यामुळे सरकार विरोधकांची मतेही मान्य करणार काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. जीएसटी आणि भूसंपादन ही दोन्ही विधेयके संसदेच्या समितीकडे पाठविण्यात आली आहेत आणि ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारित होतील, अशी सरकारला आशा आहे.राज्यसभेत जीएसटी आणि भूसंपादन यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकावरून कोंडी निर्माण झाल्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग मंदावला आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, ही दोन्ही विधेयके देशाच्या हिताची आहेत. राजकारण बाजूला सारून सर्वच राजकीय पक्षांनी या विधेयकांची प्रशंसा करायला पाहिजे. राज्यांनी जीएसटी रचनेला सहमती दर्शविलेली आहे. जीएसटी विधेयक लोकसभेत पारितही झालेले आहे. आता ही दोन्ही विधेयके पारित होणे हा वेळेचा भाग आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपुआ सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ह्या पंतप्रधान कार्यालयावर ‘वास्तविक’ शक्तीचा वापर करीत असणाऱ्या ‘घटनाबाह्य शक्ती’च्या रूपात कार्यरत होत्या; परंतु आता मात्र घटनात्मक मार्गानेच सरकार चालविले जात आहे, अशी टीका मोदी यांनी बुधवारी केली.रालोआ सरकार संसदेत उघड अहंकार प्रदर्शित करीत आहे आणि हे सरकार केवळ एका व्यक्तीचे सरकार आहे, हा सोनियांचा आरोप फेटाळून लावताना मोदी म्हणाले, ‘याआधी खऱ्या अर्थाने घटनाबाह्य शक्ती सत्ता संचालन करीत होती व सोनिया गांधी ह्या कदाचित त्याचाच उल्लेख करीत असाव्यात. आता मात्र सत्तेचे संचालन घटनात्मक मार्गाने केले जात आहे. आम्ही घटनात्मक मार्गाने काम करीत आहोत मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही शरसंधान केले. यावेळी त्यांनी पीएमओमध्ये शक्ती केंद्रित होणे, अल्पसंख्याक, बिगर सरकारी संघटना, भूसंपादन आणि जीएसटी विधेयक, आर्थिक सुधारणा व अन्य अनेक मुद्यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली.पंतप्रधान कार्यालयात सर्व शक्ती केंद्रिभूत झाल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, ‘हा प्रश्न तेव्हा विचारला असता तर बरे झाले असते, जेव्हा एक घटनाबाह्य शक्ती घटनात्मक शक्तीवर बसलेली होती आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व शक्तींचा वापर करीत होती. पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालय हे पूर्णपणे घटनात्मक व्यवस्थेचा भाग आहेत.’राहुल गांधी यांच्या ‘सुटाबुटातील सरकार’ या आरोपावर मोदी म्हणाले, वर्ष लोटले तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव अद्याप पचविता आलेला नाही. जनतेने काँग्रेसला तिच्या चुका व पापांबद्दल दंड दिला आहे. यातून काँग्रेस काही शिकेल, असे आम्हाला वाटले होते; पण तसे काही होताना दिसत नाही.