शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन आता अधिक सुलभ!

By admin | Updated: December 30, 2014 02:31 IST

इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत सुविधा, परवडणारी घरे आणि संरक्षणविषयक प्रकल्प यासाठी जमीन अधिग्रहण सुलभ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.

वटहुकुमास मंजुरी : भरीव भरपाई व पुनर्वसन, गुंतवणुकीस चालना, आर्थिक सुधारणांचा रेटा नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारने गेल्या जानेवारीत केलेल्या नवीन भूसंपादन कायद्यातील काही जाचक अटी शिथिल करून इंडस्ट्रियल कॉरिडॉर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत सुविधा, परवडणारी घरे आणि संरक्षणविषयक प्रकल्प यासाठी जमीन अधिग्रहण सुलभ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे सुमारे १.३५ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागू शकतील, असे तज्ज्ञांना वाटते.तसेच संरक्षण व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आधी वगळलेल्या १३ प्रकारच्या कामांसाठी जमीन घेतली तरीही त्याला वाढीव भरपाई व सर्वंकष पुनर्वसनाचे निकष लागू करण्याची तरतूदही या वटहुकुमात करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, देशाच्या विकासाच्या गरजा लक्षात घेता सध्या लागू असलेल्या कायद्यातील काही तरतुदी शिथिल करण्याची व ‘१०ए’ हे पुनर्वसन आणि भरपाईसंबंधीचे नवे कलम समाविष्ट करण्याची तरतूद या वटहुकुमात असेल. आधीच्या कायद्यात पीपीपी प्रकल्पांसाठी ७० टक्के जमीनमालकांची संमती असल्याखेरीज भूसंपादनास मज्जाव होता. मात्र आता राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, ग्रामीण विद्युतीकरणासह तेथील पायाभूत सुविधांची उभारणी, इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि पीपीपी प्रकल्पांसह जेथे जमिनीची मालकी सरकारकडेच राहील अशा सामाजिक सुविधांची उभारणी अशा उद्देशांसाठी केल्या जाणाऱ्या जमीन अधिग्रहणास संमतीची ही अट लागू राहणार नाही, असे जेटली म्हणाले. तसेच यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’ची अटही शिथिल करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकारने ठामपणे काम करायला हवे व घेतलेले निर्णय अंमलात आणण्याचा निर्धार सरकारकडे असायलाच हवा. कोळशाप्रमाणेच लोहखनिज व बॉक्साईट या खनिजाच्या खाणपट्ट्यांचेही लिलाव करणे शक्य व्हावे यासाठी ‘माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ या कायद्यातही सुधारणा करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठीच्या वटहुकुमावर अद्याप निर्णय झालेला नाही.- अरुण जेटली, अर्थमंत्री वटहुकुमाची ठळक वैशिष्ठ्येच्ठरावीक उद्देशांसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठी ७०% जमीनमालकांची संमती व ‘सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’ची अट शिथिल.च्अधिग्रहित जमिनीसाठी ग्रामीण भागांत प्रचलित बाजारभावाच्या चारपट व शहरी भागांत दुप्पट भरपाई देण्याची तरतूद कायम.च्आधी ज्या १३ कायद्यांन्वये केल्या जाणाऱ्या भूसंपादनाच्या वेळी पुनर्वसन पॅकेज लागू नव्हते त्यांनाही आता घरटी एका प्रकल्पग्रस्तास नोकरी देण्यासह पुनर्वसन.च्आधीच्या कायद्यानुसार एकाहून अधिक पिके घेतल्या जाणाऱ्या ओलिताखालील जमिनी कोणत्याही कारणासाठी संपादित करण्यास पूर्ण मज्जाव होता. आता उपरोक्त सहा उद्देशांसाठी अशा शेतजमिनीही संपादित करण्यास मुभा असेल.१. कोळसा खाणपट्ट्यांचे लिलावाने वाटप २. विमा उद्योगातील एफडीआयची मर्यादा २६% वरून ४९ टक्के ३. भूसंपादन अधिक सुलभ महत्त्वाच्या विषयांवरील वटहुकूम काढून सरकारने दमदार आर्थिक विकासास पूरक अशा सुधारणावादी धोरणांशी आपली कटिबद्धता दाखविली असली तरी येत्या फेब्रुवारीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यांत या सर्व वटहुकुमांची जागा घेणारे कायदे मंजूर करून घ्यावे लागतील. अन्यथा हेच वटहुकूम पुन्हा जारी करण्याची नामुश्की सरकारवर येऊ शकेल.