शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

भूसंपादन विधेयक पुन्हा अधांतरी

By admin | Updated: July 31, 2015 02:55 IST

सध्याच्या स्वरूपातील भूसंपादन विधेयक संपल्यातच जमा आहे. भाजपाचे एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील ३० सदस्यीय संयुक्त संसदीय समितीतील घडामोडींचे संकेत

नवी दिल्ली : सध्याच्या स्वरूपातील भूसंपादन विधेयक संपल्यातच जमा आहे. भाजपाचे एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील ३० सदस्यीय संयुक्त संसदीय समितीतील घडामोडींचे संकेत तेच सांगतात. भाजपाची मूळ कल्पना असलेल्या या विधेयकात एकूण १६ प्रमुख दुरुस्त्या या संयुक्त समितीने सुचविल्या आहेत.माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी होणारी बैठक अहलुवालिया यांनी लांबणीवर टाकली. आता ४ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत अहवालाला अंतिम आकार दिला जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ आॅगस्ट रोजी तो सभागृहात सादर होईल. या समितीतील १६ सदस्यांनी सुधारणा सुचविल्या आहेत. काँग्रेस (५), तृणमूल काँग्रेस (२), बसपा, जेडीयू, राकाँ, माकप, वायएसआर, अण्णाद्रमुक, टीआरएस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा त्यात समावेश आहे. शिवाय, सध्याच्या स्वरूपावर बिजद व तेलुगु देसमचा असलेला आक्षेप वेगळाच. भाजपाच्या ११ आणि लोकजनशक्तीच्या एका सदस्यांचे समर्थन पाहता या समितीत भाजपाकडे बहुमत नाहीच. समितीतील सदस्यांच्या इच्छेनुसार सरकारची या वटहुकूमात महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी आहे, असे ग्रामीण विकासमंत्री वीरेंदरसिंग यांनी सांगितले आहे.