शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या कुटुंबीयांची पुन्हा मालमत्ता जप्त, पत्नी आणि मुलांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 20, 2017 18:14 IST

प्राप्तिकर विभागानं लालू कुटुंबीयांच्या मालकीच्या आतापर्यंत 10 मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - बेनामी मालमत्तेच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. प्राप्तिकर विभागानं लालू कुटुंबीयांच्या मालकीच्या आतापर्यंत 10 मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले तेजस्वी यादव आणि लालूंची कन्या मीसा भारती यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच प्राप्तिकर विभागानं लालूंची पत्नी राबडी देवींच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. प्राप्तिकर विभागानं बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत ही कारवाई केली असून, लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव, मुलगी मीसा भारती आणि तिचे पती शैलेश, मुलगी रागिनी आणि मुलगी चंदा यांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वीच लालू यांच्या मुलांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आदेश सोमवारी देण्यात आले होते. बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या बेनामी मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली आहे. लालूंची कन्या आणि राज्यसभेची खासदार मीसा भारती यांची मालमत्ता प्राप्तिकर विभागानं बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत जप्त केली आहे. त्यामुळे मीसा भारती आता स्वतःच्या मालमत्तेची विक्रीही करू शकणार नाहीत, तसेच त्यांना ती मालमत्ता भाडेतत्त्वावरही देता येणार नाही. काल मीसा भारतीच्या मालकीच्या 4 मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीमुळे मीसा भारती यांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली होती. मीसा भारती बेनामी संपत्तीप्रकरणी आतापर्यंत दोनदा प्राप्तिकर विभागासमोर अनुपस्थित राहिल्या आहेत. तत्पूर्वी प्राप्तिकर विभागानं मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे बेनामी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारतींच्या अडचणीत वाढ झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वी लालूंचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)नं रद्द केला होता. तेज प्रताप यांनी चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल पंपाचा परवाना मिळवल्याचा आरोप करत नोटीसही बजावण्यात आली होती.