शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या कन्या मीसा भारती यांची मालमत्ता जप्त

By admin | Updated: June 19, 2017 21:12 IST

बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दल पार्टीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या अघोषित मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दल पार्टीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या अघोषित मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली आहे. लालूंची कन्या आणि राज्यसभेची खासदार मीसा भारती यांची मालमत्ता प्राप्तिकर विभागानं बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत जप्त केली आहे. त्यामुळे मीसा भारती आता स्वतःच्या मालमत्तेची विक्रीही करू शकणार नाहीत, तसेच त्यांना ती मालमत्ता भाडेतत्त्वावरही देता येणार नाही. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, मीसा भारतीच्या 4 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक अनियमिततेमुळे मीसा भारती यांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली आहे. मीसा भारती बेनामी संपत्तीप्रकरणी आतापर्यंत दोनदा प्राप्तिकर विभागासमोर अनुपस्थित राहिल्या आहेत. तत्पूर्वी प्राप्तिकर विभागानं मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे बेनामी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारतींच्या अडचणीत वाढ झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वी लालूंचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)नं रद्द केला होता. तेज प्रताप यांनी चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल पंपाचा परवाना मिळवल्याचा आरोप करत नोटीसही बजावण्यात आली होती.8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेड्या ठोकल्यात. ईडीने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचं समोर आलं होतं. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेनामी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.

(लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली होती. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली होती. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे.