शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मांझीच्या इफ्तार पार्टीला लालूप्रसादांची हजेरी

By admin | Updated: June 29, 2016 06:02 IST

मांझी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला लालुप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावल्यामुळे सत्ताधारी आघाडीतील जनता दल (यू) मध्ये अस्वस्थता

एस. पी. सिन्हा,

पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला लालुप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तसेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावल्यामुळे सत्ताधारी आघाडीतील जनता दल (यू) मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर मांझी काही वेगळे राजकारण करु पाहत आहे की काय, या शंकेमुळे केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा व एनडीएमध्येही खळबळ माजली आहे.सध्या बिहारमध्ये विविध राजकीय नेत्यांतर्फे सतत इफ्तारच्या पार्ट्या सुरू आहेत. जीतनराम मांझी यांनी सोमवारी इफ्तारच्या खान्याचे आयोजन केले होते. त्याचे निमंत्रण मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व लालुप्रसाद यादव यांच्यासह अनेकांना देण्यात आले होते. शिवाय मांझी यांनी लालुप्रसाद यांना फोन करूनही येण्याचा आग्रह केला होता. मुख्यमंत्री काही इफ्तार पार्टीला गेले नाहीत, पण लालुप्रसाद व तेजस्वी हे मात्र गेले. मुळात यादव पिता-पुत्रांनी तिथे जाण्यामुळे जदयूमध्ये बरीच अस्वस्थता दिसू लागली आहे. सध्या लालुप्रसाद हे नितीश कुमार यांच्यावर नाराज असून, ती नाराजी दाखवण्यासाठीच ते तिथे गेले, असे काहींचे म्हणणे आहे. सत्ताधारी आघाडीत लालुप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल असला तरी नितीश कुमार या पक्षाला आणि त्यांच्या मंत्र्यांना फारसे विचारत नाहीत, अशी एक तक्रार आहे. शिवाय दारूबंदीच्या मुद्द्यावर आधी विचारविनिमय न केल्यामुळे राजदचे नेते संतप्त असल्याची चर्चा आहे. एनडीएचा भाग असलेले जीतनराम मांझी यांचे बिहारमध्ये वेगळे राजकारण सुरू झाले आहे की काय, अशी चर्चा भाजपामध्ये चालली आहे. ते लालुप्रसाद यांच्याजवळ चालल्याने भाजपा नेते अस्वस्थ आहेत. जीतनराम मांझी यांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपाशी जवळीक केल्याचा कोणताच फायदा मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यासाठीच त्यांनी लालुप्रसाद व तेजस्वी यादव यांना इफ्तारला बोलावले असावे, असे सांगण्यात येत आहे. >आघाडीत आलबेल नाही?आपणास मांझी यांनी फोन केला होता. पण तो आला नसता, तरी मी इथे येणार होतो, असे वक्तव्य लालूप्रसाद यांनी तिथे काढले. त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारच्या सत्ताधारी आघाडीत सारेकाही आलबेल नाही, असा अर्थ लावण्यात येत आहेत. जीतनराम मांझी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये तेजस्वी यादव आणि लालू यादव.