शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एवढंही हसवू नका !, लालूंनी उडवली मोदींच्या भाषणाची खिल्ली

By admin | Updated: February 17, 2017 12:56 IST

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील भाषणात स्वतःला 'उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र' असे म्हटले होते. लालू यांनी याचाच ट्विटरमध्ये उल्लेख करत 'पंजाब में खून का बेटा और उत्तर प्रदेश में दत्तक पुत्र! गजब है रे भाई..इतना मत हंसाओ!", असे सांगत पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा टार्गेट केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील प्रचारसभेला संबोधित करताना म्हटले की, 'भगवान श्रीकृष्ण यांची उत्तर प्रदेश ही जन्मभूमी तर गुजरात कर्मभूमी. मी गुजरातमध्ये जन्मलो आणि उत्तर प्रदेशनं मला दत्तक घेतले. ही माझी कर्मभूमी आहे. उत्तर प्रदेशला सोडेन, असा मी मुलगा नाही.
 
दत्तक मुलगाही आई-वडिलांची काळजी घेणार आणि येथील परिस्थिती बदलण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडणार. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. बहुमत देऊन उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी जनतेला केले. पंतप्रधानांच्या याच विधानांवरुन कोपरखळी घेत, 'आता एवढंही हसवू नका !', असे ट्विट करत लालूंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.