शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ललितगेट; कुणाचाही राजीनामा नाही

By admin | Updated: July 1, 2015 01:24 IST

ललितगेट आणि प्रामुख्याने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व त्यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांच्या भूमिकेवरुन एकीकडे काँग्रेसने राजकीय हल्ला तीव्र केला असताना दुसरीकडे भाजपाने

नवी दिल्ली : ललितगेट आणि प्रामुख्याने राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व त्यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांच्या भूमिकेवरुन एकीकडे काँग्रेसने राजकीय हल्ला तीव्र केला असताना दुसरीकडे भाजपाने विरोधकांच्या आक्रमणाला फारसे महत्त्व न देण्याचे ठरविले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कितीही गोंधळ घातला, दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प पाडले तरीही याप्रकरणी कुठलाही मंत्री अथवा मुख्यमंत्री राजीनामा देणार नाही, असे डावपेच भाजपाने आखले आहेत.पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळातही संसद अधिवेशनाचे कामकाज ठप्प पडत होते. परंतु त्यांच्या कलंकित मंत्र्यांनी संबंधितप्रकरणी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच राजीनामा दिले. एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असे ललित मोदी प्रकरणात काहीही नाही, असा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा दावा आहे. त्यातच वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याने राजस्थानातही आणखी एक येदियुरप्पा तयार होऊ शकतो. कर्नाटकात भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना पक्षश्रेष्ठींनी पदत्याग करण्याचे निर्देश दिल्यानंतर येदियुरप्पांनी बंडखोरी करून आपल्या समर्थकांसह नवा पक्ष स्थापन केला होता. याचे परिणाम भाजपाला अनेक निवडणुकांमध्ये भोगावे लागले. अखेर पक्षाला येदियुरप्पांची सन्मानाने घरवापसी करावी लागली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याप्रकरणी राजे यांनी राजीनामा दिल्यास विरोधक आणखी आक्रमक होऊ शकतात.दरम्यान, ललित मोदींसोबतच्या संबंधांबाबत काँग्रेसकडून दररोज होणाऱ्या आरोपांवर विचारलेल्या कुठल्याही प्रश्नावर मौन पाळण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी वसुंधरा राजे यांना केली आहे. या संदर्भातील प्रश्नांना राजस्थान भाजपाचे अध्यक्ष आणि प्रवक्ता उत्तर देतील, असे सांगण्यात आले.