शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

या बाईंनी स्मार्टफोनला शिकवल्या भारतीय भाषा

By admin | Updated: June 22, 2017 13:15 IST

जर तुम्ही इंडस ओएसवर आधारित स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला आता टाइप केलेला मजकूर एका क्लिकवर भाषणाच्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे आणि तेसुद्धा तुमच्या बोली भाषेमध्ये.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 22-  जर तुम्ही इंडस ओएसवर आधारित स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला आता टाइप केलेला मजकूर एका क्लिकवर भाषणाच्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे आणि तोसुद्धा तुमच्या बोली भाषेमध्ये. ही गोष्ट जरी सहजासहजी पटणारी नसली तरीसुद्धा हे आता शक्य होणार आहे. मजकूराला भाषणात रूपांतरीत करण्याचं तंत्रज्ञान डॉ. हेमा मुर्थी या बाईंमुळे शक्य होतं आहे. हे नवं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हेमा मुर्थी यांनी पंधरा वर्ष काम केलं आहे.  द इकोनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. 
 
प्रोफेसर मुर्ती आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये दररोज सकाळी कॉफी घेत असताना मोबाइलवरील मजकूराचं भाषणात कसं रूपांतर करता येइल याबद्दल विचार करत असत. मजकूराचं 8 भारतीय भाषांमध्ये संभाषणात रूपांतर करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार काम करून त्यांनी स्मार्टफोनला 8 भारतीय भाषा शिकविल्या आहेत. हेमा मुर्थी जेव्हा या विषयावर रिसर्च करत होत्या त्याचदरम्यान इंडस ओएसचे सीईओ राकेश देशमुख अशाच प्रकारचं संभाषण व्यासपीठ विकसित करण्याच्या विचारात होते ज्यामुळे स्थानिक ऑपरेटिंग सिस्टम आणखी वाढेल.  
 
2015 मध्ये इंडस ओसेने हेमा मुर्थी यांच्या टेक्स टू स्पीच या प्रणालीबरोबर काम करायला सुरूवात केली होती. याचा परिणाम म्हणजे टेक्स टू स्पीच ही प्रणाली. मजकूराला भाषणात रूपांतरीत करण्याचं हे तंत्रज्ञान मायक्रोमॅक्स, सेल्कोन, कार्बन आणि स्वाईप  या स्मार्टफोनमध्ये वापरायला मिळतं आहे.  डॉ. हेमा मुर्थी यांनी कॉम्युटर सायन्समधून पीएचडी केली आहे. भाषण प्रक्रियेतील विविध गोष्टी करून पाहणं यामध्ये त्यांचा जास्त रस होता. त्याचाच उपयोग करून त्यांनी मजकूराचं भाषणात रूपांतरीत करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. "भारतीय भाषांमध्ये विविधता आहे. प्रत्येक भाषा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच एखादं डिवाइस जे इंग्रजीमध्ये लिहीलेला मजकूर इतर भाषेमध्ये भाषणाच्या स्वरूपात रूपांतरीत करेल, ते तयार करण्याचा मी विचार केला, असं मत हेमा मुर्थी यांनी व्यक्त केलं.