वाळू तस्कराला ठोठावला लाखाचा दंड
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
पाचोड : दहा दिवसांपूर्वी औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठणचे तहसीलदार संजय पवार व पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी वाळूच्या ट्रक पकडून तहसीलदारांनी कारवाई करून तब्बल १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
वाळू तस्कराला ठोठावला लाखाचा दंड
पाचोड : दहा दिवसांपूर्वी औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठणचे तहसीलदार संजय पवार व पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी वाळूच्या ट्रक पकडून तहसीलदारांनी कारवाई करून तब्बल १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. गोदावरी पात्रातील वाळूपट्ट्याचा लिलाव अद्यापपर्यंत झालेला नाही तरी पण वाळू तस्कर लपून-छपून चोरून वाळू वाहतूक करीत होते; पण मध्यंतरी पाचोड पोलीस व पैठण तहसीलदारांनी रोडवर उतरून चोरून वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाया केल्या होत्या. त्यामुळे वाळू माफियांनी वाळू वाहतूक बंद केली होती; पण पोलिसाकडे वाळूच्या गाड्या आहे. त्यामुळे त्यांनी वाळू वाहतूक सुरू केली होती.गोदावरी पात्रातून पोलिसाच्या गाड्यामधून वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पैठणचे तहसीलदार संजय पवार यांना मिळाली होती. यानंतर संजय पवार यांनी तात्काळ पाचोडचे भगवान धबडगे यांना माहिती दिली. यानंतर या दोघांनी सापळा रचून एक बंद बॉडी मालट्रक नंबर (एमएच-२०-डीई-०५४४) ही गाडी पकडून जप्त केली. यानंतर तहसीलदारांनी या गाडीमधून वाळूचे मोजमाप केले. तहसीलदार संजय पवार यांनी एक लाख ६६ हजार रुपये दंड ठोठावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या वाळूच्या चार वाहनातील वाळूचे मोजमाप होऊन सोमवारी दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.