शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कालपर्यंत येथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कालपर्यंत येथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.
माळेगाव यात्रेस शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. यात्रेचे नियोजन महिनाभरापासून केले जात असले तरी आज प्रत्यक्षात यात्रेला सुरुवात झाली असताना भाविकांना सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशीच ठरल्याचे दिसून आले. माळेगाव यात्रेतील घोडेबाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. या घोड्यांच्या रपेटीसाठी असलेल्या यावर्षी मैदानाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. दरवर्षी येथे थोडा का होईना मुरुम टाकला जातो. मात्र यंदा एक टोपलेही टाकले नसल्याची बाब आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी जि.प.चे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी पाणी पुरवठाही होत नसल्याने पशुपालकांमध्ये ओरड असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाने मात्र येथे १० टँकर सुरू आहेत. तसेच येथे असलेल्या जलकुंभाद्वारे भाविकांना पाणी पुरविले जात असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेने यंदा भाविकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय आणण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रत्यक्षात हे शौचालय पहिल्या दिवशी उपलब्ध झालेच नव्हते. दुसरीकडे येथे असलेले तीन सार्वजनिक शौचालय कुलूप बंदच आहेत. त्यामुळे फिरत्या शौचालयासाठी १० लाख रुपये जिल्हा परिषद खर्च का करत असावे? हा प्रश्न पुढे आला आहे. माळेगावातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजीही अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम विभागाला दिलेल्या १४ लाखांचे नेमके काय झाले असावे? असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत. एकीकडे लावण्यावर लाखो रुपये उधळणार्‍या जिल्हा परिषदेला भाविकांच्या मुुलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.