शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना दिलासा! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; दुप्पट लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 08:34 IST

बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू

केंद्रीय कामगार मंत्रालय बेरोजगारांना मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे. नव्या प्रस्तावानुसार ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी बेरोजगार झाल्यास त्यांना ६ महिने भत्ता दिला जाईल. या भत्ता शेवटच्या पगाराच्या ५० टक्के इतका असेल. सध्याच्या घडीला बेरोजगारांना शेवटच्या वेतनाच्या २५ टक्के इतकी रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. याशिवाय भत्ता ३ महिनेच देण्यात येतो. मात्र आता हा कालावधी दुप्पट होणार आहे. एखादी व्यक्ती बेरोजगार झाल्यास त्याला पुढील ३ महिने शेवटच्या पगाराच्या २५ टक्के इतकी रक्कम भत्ता म्हणून दिली जाते. एखादा कर्मचारी केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतो, असा सध्याचा नियम आहे. मात्र आता ही मर्यादा संपुष्टात आणली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या व्यक्तींना दिलासा मिळू शकेल. २० ऑगस्टला कर्मचारी राज्य विमा निगमच्या सदस्यांची बैठक होणार आहे. त्यात हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ईएसआयशी जोडले गेलेल्या ३.२ कोटी कामगारांना फायदा होईल.पंतप्रधान कार्यालयाकडून याबद्दलची संकल्पना मांडण्यात आली. कोरोना संकटाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. अमेरिका, कॅनाडामध्ये बेरोजगारांना भत्ता दिला जातो. त्याच धर्तीवर बेरोजगारांना आर्थिक मदत देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. गेल्याच आठवड्यात हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला. आता तो ईएसआयसीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका लघु आणि मध्यम उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. सीएमआयईनं दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये लॉकडाऊनमुळे १२.१ कोटी लोकांना नोकरी गमवावी लागली. मात्र मे, जूनमध्ये परिस्थिती सुधारली. आतापर्यंत ९.१ कोटी लोकांना रोजगार परत मिळाला आहे. मात्र अद्याप ३ कोटी लोकांकडे रोजगार नाही. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे. 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी