शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:27 IST

आयकर विभागाने एका मजुराला तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे.

बिहारच्या गयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयकर विभागाने एका मजुराला तब्बल २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गया येथील नवीन गोडाऊन परिसरात राहणारा राजीव कुमार वर्मा हा मजुरीचं काम करतो. त्याचं सर्वकाही सुरळीत चाललं होतं पण अचानक आयकर विभागाच्या नोटीसने त्याला मोठा धक्का बसला आहे.

राजीव कुमार वर्मा याने सांगितलं की, त्याने २२ जानेवारी २०१५ रोजी गया येथील कॉर्पोरेशन बँकेच्या शाखेत २ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते. पण मुदतपूर्तीपूर्वी त्याने काही कामासाठी १६ ऑगस्ट २०१६ रोजी हे पैसे काढून घेतले. त्यानंतर मजुरीचं काम सुरू केलं. मात्र आता अचानक आयकर विभागाने २ कोटी ३ हजार ३०८ रुपयांची नोटीस पाठवली आहे.

२०१५-१६ या वर्षात २ कोटी रुपयांची फिक्स डिपॉझिट करण्यात आली होती, ज्याची रिटर्न फाइल अद्याप भरलेली नाही आणि आयकर विभागाचा करही जमा करण्यात आलेला नाही, असं नोटिसमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचवेळी, मजूर राजीव कुमार वर्माचं नावही प्रथमच आयकर रिटर्न फाईलमध्ये आलं. आता महिन्याला १० ते १२ हजार रुपये मजुरी मिळत असेल तर काय कर भरणार असंही मजुराने म्हटलं आहे. 

आयकर विभागाच्या नोटीसनंतर मजूर गेल्या ४ दिवसांपासून कामावर गेलेला नाही. नोटीसनंतर, तो चिंतेत पडला आणि आयकर विभागाच्या कार्यालयात गेला आणि तेथील अधिकाऱ्याशी बोलला, ज्यावर अधिकाऱ्यांनी त्याला उत्तर दिलं की आता त्याने पाटणा आयकर विभागाच्या कार्यालयात जावं. जिथून निदान करता येईल. या संपूर्ण घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स