कुंकळ्येकर आज अर्ज भरणार
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
(सिद्धार्थच्या चेहर्याच्या फोटोसह चौकट)
कुंकळ्येकर आज अर्ज भरणार
(सिद्धार्थच्या चेहर्याच्या फोटोसह चौकट)भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे शनिवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी पावणे दहा वाजता कुंकळ्येकर, भाजप नेते व कार्यकर्ते येथील महालक्ष्मी मंदिराजवळ जमणार आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी या वेळी उपस्थित असतील. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील व निवडणूक अधिकार्यांना उमेदवारी अर्ज सादर करतील. त्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.