जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
नाशिक : शहरात आगामी कुंभमेळा निमित्त जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत तयार करण्यात येत आहे. त्याचे चित्रीकरण मागिल ८ दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी सुरू आहे. सदर गीताच्या चित्रीकरणामध्ये पालकमंत्री, सर्व खासदार-आमदार, महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक तसेच शहरातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग आहे. यामध्ये शहरातील सर्व सामाजिक संस्थेचाही सहभाग असावा या हेतुने जेएसजी प्लॅटिनम ग्रुपने शहरातील सर्व सामाजिक संस्थेच्या सदस्यांसाठी रविवारी दुपारी ४ वाजता यशवंत पटांगण, रामकुंड येथे एक व्हिडीयो चित्रीकरण आयोजित केले आहे. त्यामध्ये प्रत्येक संस्थेला सहभागी होता येईल. तरी इच्छुक संस्थांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपावेतो ट्रॉफी हाऊस, सिंडीकेट बँकेजवळ, अशोक स्तंभ येथे संपर्क साधावा असे आवाहन ग्रुपच्या अध्यक्षा कल्पना
जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत
नाशिक : शहरात आगामी कुंभमेळा निमित्त जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत तयार करण्यात येत आहे. त्याचे चित्रीकरण मागिल ८ दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी सुरू आहे. सदर गीताच्या चित्रीकरणामध्ये पालकमंत्री, सर्व खासदार-आमदार, महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक तसेच शहरातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग आहे. यामध्ये शहरातील सर्व सामाजिक संस्थेचाही सहभाग असावा या हेतुने जेएसजी प्लॅटिनम ग्रुपने शहरातील सर्व सामाजिक संस्थेच्या सदस्यांसाठी रविवारी दुपारी ४ वाजता यशवंत पटांगण, रामकुंड येथे एक व्हिडीयो चित्रीकरण आयोजित केले आहे. त्यामध्ये प्रत्येक संस्थेला सहभागी होता येईल. तरी इच्छुक संस्थांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजेपावेतो ट्रॉफी हाऊस, सिंडीकेट बँकेजवळ, अशोक स्तंभ येथे संपर्क साधावा असे आवाहन ग्रुपच्या अध्यक्षा कल्पना पाटणी व सेक्रेटरी किरण खाबिया यांनी केले आहे. (वा. प्र.)-------