शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुमार विश्वासांवरून महिला आयोगात जुंपली

By admin | Updated: May 6, 2015 00:45 IST

कथित अनैतिक संबंधांमुळे आपचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील (आप) एका महिला कार्यकर्त्यासोबत कथित अनैतिक संबंधांमुळे या पक्षाचे नेते कुमार विश्वास अडचणीत आले असतानाच त्यांना या मुद्यावरून समन्स बजावण्याच्या निर्णयावरून दिल्ली महिला आयोगात मंगळवारी चांगलीच जुंपली. कुमार विश्वास यांच्याविरुद्ध राजकीय कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप आयोगाच्या सदस्य जुही खान यांनी केला असून समन्स बजावण्याच्या निर्णयावर त्या अध्यक्ष बरखा सिंग यांच्यावर उखडल्या आहेत. आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिली. दुसरीकडे बरखा सिंग यांनी मात्र विश्वास आणि त्यांच्या पत्नीला समन्स बजावण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. विश्वास यांनी या समन्सची दखल घेतली नसल्याने त्यांना नव्याने नोटीस पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला आयोगाने सोमवारी विश्वास व त्यांच्या पत्नीस समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते; परंतु ते आयोगाच्या कार्यालयात पोहोचलेच नाहीत. आपल्याला आयोगाची नोटीस मिळाली नसल्याचे विश्वास यांचे म्हणणे आहे. विश्वास यांच्यासोबत कथित अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या महिलेने न्यायासाठी दिल्ली महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. या आरोपांमुळे आपली प्रचंड बदनामी झाली असून वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे; परंतु विश्वास यांनी या अफवांचे अजूनही खंडन केलेले नाही, अशी या महिलेची तक्रार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)