शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या सवलतीवर कु-हाड

By admin | Updated: September 6, 2016 21:25 IST

फुटीरतावाद्यांची चर्चा न करण्याची आठमुठी भूमिका कायम असल्याने केंद्र सरकार या फुटीरतावाद्यांना मिळणा-या सुविधांमध्ये कपात करण्याच्या विचारात आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ६ - काश्मिरातील तिढा सोडवण्यासाठी तिथे गेलेल्या शिष्टमंडळावर बहिष्कार घालणाऱ्या फुटिरवादी नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा आणि प्रसंगी पूर्णपणे काढण्याचा निर्णयाचा निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकारने विचार सुरू केला असून, या फुटिरवाद्यांचे परदेशी दौरे बंद केले जाण्याची आणि वैद्यकीय सुविधाही काढून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. फुटिरवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठीच केंद्र सरकार या निष्कर्षाप्रत आले आहे. 

हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी, अवामी अ‍ॅक्शन कमिटीचे मिरवाइज उमर फारुख, पीपल्स कॉन्फरन्सचे अब्दुल गनी लोण, जेकेएलएफचा नेता यासिन मलिक, मुस्लीम कॉन्फरन्सचे अब्दुल गनी भट्ट, इत्तेहुद उल मुस्लमीनचे महमद अब्बास अन्सारी तसेच पीपल्स लीगचे शेख याकूब आदी नेत्यांना सरकारतर्फे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. हे सारे नेते फुटिरवादी असून, त्यांनी व त्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी काश्मिरात गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्याचे टाळले. एवढेच नव्हे, तर शिष्टमंडळातील काही नेते जेव्हा गिलानी यांना भेटावयास गेले, तेव्हा त्यांनी या नेत्यांना भेट नाकारली.हे नेते भारतीय नेत्यांशी असे वागत असतील आणि फुटिरवादी कारवाया देशात राहून सुरू ठेवणार असतील, तर त्यांना संरक्षण देण्याचे काय कारण, असा प्रश्न केंद्र सरकारला पडला आहे. त्यामुळेच त्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा आणि प्रसंगी ती पूर्णपणे काढून घेण्याचा गंभीरपणे विचार सुरू आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार ती पूर्णत: काढून घेतली जाणार नसून, कमी केली जाईल, असे दिसते. सुरक्षा काढून घेतल्यानंतर या नेत्यांना दगाफटका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, त्यातून पुन्हा काश्मीरमधील परिस्थिती बिघडू शकेल, याची केंद्राला पूर्ण कल्पना आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्याचा अहवाल त्यांना सादर केला. त्यानंतर फुटिरवादी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यावर विचार सुरू झाला, असे सांगण्यात आले. याशिवाय या नेत्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध आणले जातील आणि सरकारतर्फे पुरवली जाणारी वैद्यकीय सुविधाही थांबवली जाईल, अशी शक्यता आहे. सर्व बाजुंनी त्यांना एकटे पाडण्याचा केंद्रा चा हा प्रयत्न दिसत आहे. हे नेते सुरक्षा व्यवस्थेत फिरून भारतविरोधी वातावरण निर्माण करतात, हे खपवून घ्यायचे नाही, असा निर्णय दिल्लीत झाला आहे.राज्यात सरकार, प्रशासन नाहीचकाश्मीरमध्ये राज्य सरकार आणि प्रशासन यांचे अस्तित्वच जाणवत नाही, अशा निष्कर्षाला सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि केंद्रातील सत्ताधारी नेतेही आले आहेत. त्यामुळेच महिला, विद्यार्थी आणि तरुण अतिशय अस्वस्थ आहेत. त्यांच्यात विश्वासाची भावना निर्माण करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. अर्थात सध्याच्या परिस्थितीत हे केंद्रापुढील मोठेच आव्हान आहे. राज्यात पीडीपीबरोबरच भाजपाही सत्तेत असताना, तेथील सरकारवर ठपका ठेवणे केंद्र सरकारला परवडणारे नाही. शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यात यावरही चर्चा झाली. तरुणांना फुटिरवाद्यांपासून दूर करणे खूप अवघड आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार आणि कृती करायला हवी, असे सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे आहे.