लाच स्विकारतांना कोतवालाला अटक
By admin | Updated: December 23, 2015 00:18 IST
सासवड : शेत जमिनीवर वारस हक्काची नोंद लावण्यासाठी शेतकर्याकडूण एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना कोतवालास लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. हरिंद्र बबन बनकर (रा. वीर, ता. पुरंदर ) असे या कोतवालाचे नाव आहे.
लाच स्विकारतांना कोतवालाला अटक
सासवड : शेत जमिनीवर वारस हक्काची नोंद लावण्यासाठी शेतकर्याकडूण एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना कोतवालास लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. हरिंद्र बबन बनकर (रा. वीर, ता. पुरंदर ) असे या कोतवालाचे नाव आहे. वामन मुगुटराव सणस (रा. माहूर आतकरवाडी ता. पुरंदर) यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या शेत जमिनीवर वारस नोंद करण्याची होती. माहूर येथील तलाठी कार्यालयात वीर येथील हरिंद्र बनकर हा कोतवालाचे काम करीत आहे. या कोतवालाने नाव नोंदणीसाठी सणस यांच्या कडून एक हजाराची लाच मागितली. ती रक्कम त्यांनी मंगळवारी देण्याचे कबूल केले होते. याबाबत त्यांनी पुण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय येथे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्जुन सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी सहकारी यांच्यासह सापळा लावला. त्यानंतर तक्रारदार वामन सणस हे कोतवाल हरिंद्र बनकर याच्याकडे एक हजार रुपये देत असताना अधिकार्यांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यास सासवड येथील तहसीलदार कार्यालयात आणून व रीतसर कारवाई करून अटक केली.