शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोंडी फुटेना; मोदी अन्सारींना भेटले

By admin | Updated: December 18, 2015 02:08 IST

राज्यसभेतील पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

राज्यसभेतील पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची त्यांच्या कक्षात भेट घेऊन चर्चा करताना गेल्या दहा दिवसांपासून या सभागृहाचे कामकाज ठप्प पडल्याबद्दल चिंता व्यक्त केली.मोदींनी थेट डॉ. अन्सारी यांच्याशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधकांनी गुरुवारी गदारोळ घालत कामकाज बंद पाडल्यानंतर लगेच मोदींनी अन्सारींच्या कक्षात धाव घेतली. उर्वरित चार दिवस कामकाज सुरळीत चालावे यासाठी राज्यसभेत व्हीप जारी करावा यासाठी सरकारने अन्सारींकडे आग्रह धरला आहे. सभागृहातील हौदात धाव घेत वारंवार सभागृहाचे कामकाज बंद पडणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी असेही सरकारला वाटते.

हा चुकीचा पायंडाअर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना विरोधकांना चांगलेच खडसावले होते. भविष्यात विरोधकांसाठी चुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य बनविले. संसदीय कामकाज दिवसेंदिवस अवघड होत असल्याने यापुढे भविष्यातील निर्णय प्रशासनाकडे जातील, असा इशाराही त्यांनी दिला.हिटलिस्टवर ४० खासदार... राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कामकाजाचा खोळंबा करणाऱ्या ४० पेक्षा जास्त खासदारांची नावे समाविष्ट आहेत. काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेतही हौदात धाव घेण्याचे प्रकार चालविले असले तरी, लोकसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. दुसरीकडे राज्यसभेत सभापतींना कोणतेही कामकाज पार पाडणे अवघड झाले आहे. गुरुवारीही मोदी राज्यसभेत उपस्थित असताना काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पीठासीन अधिकाऱ्यांनी कर्तव्याचा भाग पाहून कामकाज पार पाडावे . गोंधळी खासदारांवर कारवाई करावी, अशी सरकारची इच्छा आहे.