ऑनलाइन टीम
कटक, दि. १४ - मुंबई इंडियन्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात मुंबई संघाने कोलकातासमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्स संघाकडून सर्वाधिक ५१ धावा रोहित शर्माने केल्या. रोहितला अंबाती रायडूची चांगली साथ मिळाली. रायडूने २७ चेंडूत ३३ धावा केल्या. रायडूने ३ चौकार आणि एक षटकार सीमेपार पाठवला. सिमेन्स १२, गौतम ८, एन्डरसन १८, पोलार्ड नाबाद १० धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ५ बाद १४१ धावा केल्या.