कोदामेंढी...
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
जि. प. सदस्यांनी घेतले तोंडली गाव दत्तक
कोदामेंढी...
जि. प. सदस्यांनी घेतले तोंडली गाव दत्तककोदामेंढी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून परिसरातील तोंडली गट ग्रामपंचायत दत्तक घेऊन शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्या शकंुतला हटवार यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्र सुकळी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी तोंडली गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. याप्रसंगी सरपंच अर्चना बुरडे, उपसरपंच जनार्दन बांते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रूपचंद बांते, ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम, सीताराम बांडेबुचे, शुभम मेश्राम, अंकुश बुरडे, कविता आस्वले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वजनिक शौचालयाकरिता दोन लाख रुपये, भूमिगत नाल्यांसाठी एक लाख तसेच प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी प्रति शौचालय १२ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार असल्याचे हटवार यांनी सांगितले. अन्य विकास कामात तीर्थक्षेत्र विकास योजनेत हनुमान मंदिर परिसरातील कामे, शाळेची नवीन इमारत व शेतकऱ्यांना धान्य साठवून तारण कर्जाच्या योजनेसाठी गोदामची योजना राबविण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. ग्रामपंचायत सचिव विकास सहारे यांनी शौचालयाची कामे तातडीने करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तोंडली गट ग्रामपंचायत अंतर्गत खिडकी व सुकळी या गावांचाही समावेश आहे. ही गावे भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असून विकासपासून वंचित राहिलेली आहेत. ही गावे दत्तक घेतल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. प्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. (वार्ताहर)