शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठींना न भेटताच राजे परतल्या

By admin | Updated: June 28, 2015 03:39 IST

ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या.

नवी दिल्ली : ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. परंतु बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी कुणालाही न भेटताच त्या जयपूरला परतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राजे यांनी स्वत: पक्ष नेत्यांना भेटण्याचे टाळले, की त्यांना भेट नाकारण्यात आली,याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. विरोधी पक्षांकडून राजे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असून पक्षाकडून मात्र त्यांची पाठराखण केली जात आहे. राजे सकाळी ९.३० वाजता दिल्लीत पोहोचल्या आणि जवळपास चार तासांनी जयपूरला परतही गेल्या. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान तसेच पक्षाध्यक्षांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता की नाही याबाबत पक्ष सूत्रांनी मौन धारण केले आहे. गुरुवारी रात्री मोदी आणि शहा यांच्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी या वादावर राजे यांनी दिलेले स्पष्टीकरण मान्य केले असल्याचे संकेत मिळाले होते. राजे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आपला पूर्वनियोजित लंडन दौरा रद्द केला होता. त्या २७ जून ते २ जुलै दरम्यान लंडन दौऱ्यावर जाणार होत्या.जयपूर येथून मिळालेल्या वृत्तानुसार नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर राजे विशेष विमानाने जयपूरला परतल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) - राजस्थान प्रदेश भाजपने वसुंधरा राजे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतरण अर्जाच्या समर्थनात वसुंधरा राजे यांनी स्वाक्षरी केलेले दस्तावेज कधी न्यायालयात सादर झालेच नाहीत. कारण नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती, असा खुलासा प्रदेश शाखेने केला आहे. राजे यांच्या मुलाच्या हॉटेलमध्ये मोदी यांनी केलेली गुंतवणूक कायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती, असाही संघटनेचा दावा आहे.