शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

सरकारी पॅलेसवर ‘राजे’शाही

By admin | Updated: June 30, 2015 02:01 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला

शीलेश शर्मा, नवी दिल्लीराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘ललितगेट’ वादामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच नव्या आरोपांमुळे राजे यांच्या अडचणीत भर पडली आहे.वसुंधरा राजे यांचे विभक्त झालेले पती हेमंतसिंग यांनी धोलपूर पॅलेस ही राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. १९५४ ते २०१० या काळात महसूल विभागाच्या अनेक दस्तऐवजातही तसा उल्लेख आढळतो. राजे आणि ललित मोदी यांच्या नियंत हेरिटेज हॉटेल या कंपनीने धोलपूर पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करताना शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारची कोणतीही भूमिका राहिली नाही. २००९ नंतर हे घडले. राजे यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात नियंत हेरिटेज हॉटेलमध्ये पुत्र दुष्यंतसिंग, सून निहारिका व ललित मोदी यांच्यासोबत शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख केला. राजेंकडे ३२८०, तर पुत्र व सुनेकडे प्रत्येकी ३२२५ शेअर्स तर मोदी यांच्या आनंद हेरिटेज हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये ८१५ शेअर्स असल्याची बाब राजे यांनी नमूद केली. यातून त्यांचे फरार मोदींशी असलेले व्यावसायिक संबंध उघड होतात, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)या कंपनीत गुंतवणुकीसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंबण्यात आला. कर वाचविण्यासाठी मॉरिशसमध्ये गुंतवणूक दाखविण्यात आली असा आरोपही रमेश यांनी केला. ललित मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळून असल्याबद्दल रमेश यांनी त्यांना ‘स्वामी मौनेंद्र बाबा’ असे संबोधत टर उडविली.भाजपने आरोप फेटाळलाधोलपूर पॅलेस खासदार दुष्यंतसिंग यांच्या मालकीचा नसल्याचा रमेश यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी व राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी फेटाळला आहे. हेमंतसिंग यांनी धोलपूरची मालकी दुष्यंत यांच्याकडे सोपविल्यासंबंधी न्यायालयीन दस्तऐवज दाखवत परनामी यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान योग्य वेळी बोलतील-सिंग-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते योग्य वेळ येताच बोलतील, असे सांगत केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी मोदींच्या मौनाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.