शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

किसान रॅलीतच घेतली फाशी

By admin | Updated: April 23, 2015 06:16 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा होता आणि आम आदमी पार्टीच्या (आप) किसान रॅलीत भाग घेण्यासाठी आला होता.गजेंद्र सिंग याच्या आत्महत्येवरून राजकीय पक्षांमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. या आत्महत्येसाठी ‘आप’ने भाजपा सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपाने पलटवार करीत ‘आप’ला दोषी ठरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आप आणि भाजपा या दोघांनाही लक्ष्य बनवित केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. परिश्रमी शेतकऱ्याने आपण एकटे आहोत असा विचार कधीही करू नये. भारतातील शेतकऱ्यांचा चांगला भविष्यकाळ घडविण्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर दिली.शेतकरी आत्महत्या करीत असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाषण ठोकत होते. महत्त्वाचे काय आहे, एखाद्याचा जीव की भाषण? आप नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हा एक कट आहे. गजेंद्र सिंगने आत्महत्या केली हे माहीत असतानाही केजरीवाल भाषण देत राहिले, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांनी केला.‘आप’च्या रॅलीत शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असल्याकारणाने या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध आत्महत्येस बाध्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. या आत्महत्येसाठी मोदी आणि केजरीवाल हे दोघेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलीस केंद्राच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले.‘आप’च्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या राजस्थानच्या शेतकऱ्याला राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी श्रद्धांजली वाहिली. माझे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांचे कल्याण व उन्नतीसाठी कटिबद्ध आहे, असे राजे म्हणाल्या.पंतप्रधान मोदी हे बडे उद्योगपती आणि मोठ्या धनिकांसाठीच आपले सरकार चालवित आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. भूसंपादन वटहुकूम घाईगडबडीत जारी केल्याबद्दल केजरीवाल यांनी सरकारवर प्रहार केला.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मतांवरच सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आता त्याच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. आता मोदी सरकारने एका वर्षातच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. भूसंपादन विधेयकाला विरोध करीत हजारोंच्या संख्येत शेतकरी या रॅलीत येत आहेत. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे केवळ मोदींच्या सभोवताल २४ तास फिरणाऱ्या बड्या धनिकांचे सरकार आहे. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी करण्याची एवढी घाई का केली, असा सवाल केजरीवाल यांनी मोदींना केला.