शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

अपहरणकर्ता समजून एकाला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:22 IST

जळगाव: खेळणार्‍या मुलांचे अपहरण करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन शिवाजी नगरातील हुडको भागात रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता अरुण उत्तम मिसाळ (वय ४५ रा.सुप्रीम कॉलनी) या मद्यपीस शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने बदडून काढले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मिसाळला ताब्यात घेतले.

जळगाव: खेळणार्‍या मुलांचे अपहरण करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरुन शिवाजी नगरातील हुडको भागात रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता अरुण उत्तम मिसाळ (वय ४५ रा.सुप्रीम कॉलनी) या मद्यपीस शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने बदडून काढले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मिसाळला ताब्यात घेतले.
शिवाजी नगरात हुडको भागात चार मुले खेळत असताना मिसाळ हा तेथे उभा होता.यावेळी वसीम खान हुसेन खान मिस्तरी व चिकन विक्रेता शाकीर याकूब खाटीक या दोघांना त्याच्याविषयी शंका आल्याने त्याला आवाज दिला.तो त्यांच्याकडे न जाता दुसरीकडे जायला लागल्याने नागरीकांना त्याचा पाठलाग सुरु केला. लोक आपल्यामागे धावत येताहेत समजून तोही पळायला लागला. यावेळी महिला व काही पुरुषांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. यात त्याच्या छातीला, पोटाला व पाठीवर मुका मार लागला आहे. हा प्रकार शहर पोलिसांना समजल्यानंतर सहायक निरीक्षक दीपक गंधाले व विजय पाटील यांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता अपहरणसारखा कोणताच प्रकार नसल्याचे सिध्द झाले.
गेल्या आठवड्यात शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्याने रविवारचा हा प्रकारही तसाच असावा अशी शंका आल्याने नागरीकांनी गैरसमजूत करुन त्यास बदडले. चौकशी अंती त्याच्या नातेवाईकांना बोलावून मिसाळला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.