चंदीगड : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा डीएलएफसोबतचा कथित जमीन गैरव्यवहार उघडकीस आणणारे हरियाणातील आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा बदली झाली. ४९वर्षीय खेमका यांच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीतील ही ४६वी बदली असून, विशेष म्हणजे आता ती भाजपा सरकारने केली आहे.खेमका यांनी या बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक मर्यादा आणि लोकांचे गुंतलेले स्वार्थ अशा परिस्थितीतही आपण राज्य परिवहन विभागात सुधारणा घडवून तेथील भ्रष्टाचार संपविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे ही बदली आपल्यासाठी अत्यंत त्रासदायक आहे, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केली आहे.
खेमका यांची २४ वर्षांत ४६वी बदली
By admin | Updated: April 3, 2015 02:38 IST