शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

'वड्रा' यांचा जमीन व्यवहार रद्द करणारे खेमका केंद्र सेवेत!

By admin | Updated: July 15, 2014 17:44 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या जमीन व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करून चर्चेत आलेले आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची पंतप्रधान कार्यालयात नेमणूक होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१५ - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करून चर्चेत आलेले आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची लवकरच पंतप्रधान कार्यालयात नेमणूक होण्याची शक्यता आहे. 
खेमका यांच्या नावाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दिला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. विशेष म्हणजे, खेमका यांच्याविरोधात दोन चार्जशीट दाखल असतानाही त्यांची बदली होत असल्याने अशोक खेमका यांच्या कामावर मोदी सरकार मेहेरबान असल्याची चर्चा आहे. 
अशोक खेमका हे हरयाणा सीड डेव्हलोप्मेंट कॉर्पोरेशन (एसएसडीसी) पदावर कार्यरत असताना त्यांची बदली जानेवारी २०१४ मध्ये जमीन व्यवहारासंबधी असलेल्या डायरेक्टर पदावर  करण्यात आली होती. या पदावर येताच खेमका यांनी रॉबर्ट वॉड्रा आणि डीएलएफ यांच्यात झालेला  ८ कोटी रूपयांच्या व्यवहार रद्द ठरवित त्यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. खेमका यांच्या या निर्णयामुळे देशभर मोठे वादळ उठले होते. त्यांच्यावर हरयाणा सरकारनेही नाराजी व्यक्त केली होती. खेमका यांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही असे सांगत खेमका यांच्याविरोधात दोन चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. परंतू लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ताबदल झाला असून आता केंद्रात मोदी यांचे सरकार असल्याने मोदी सरकारने त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवित त्यांना केंद्र सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,  हरियाणा सरकारमधील कॅबिनेट सचिवालयाने अशोक खेमका यांना हरियाणा सरकारमधून केंद्र सरकारमध्ये घेण्याची विनंती केली असून ही विनंती स्वीकारत केंद्र सरकारने  खेमका यांना केंद्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे.