खापरखेडा.. आत्महत्या
By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST
गळफास लावून एकाची आत्महत्या
खापरखेडा.. आत्महत्या
गळफास लावून एकाची आत्महत्याखापरखेडा : भाजीपाला विक्रेत्याने आपल्या बंदीस्त घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नजीकच्या भानेगाव येथे मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. दीपक रमेश बागडे (३४, रा. वॉर्ड क्रमांक १, भानेगाव) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मृताच्या घराशेजारील एका महिलेस फिट आल्याने तिला बघण्यासाठी मृत दीपकचा काका प्रकाश रामचंद्र बागडे हा जात होता. दरम्यान, त्यांना बंदीस्त रिकाम्या घरासमोर दीपकची दुचाकी उभी दिसली. त्यामुळे प्रकाश बागडे यांनी घरात जाऊन बघितले असता, त्यांना दीपक लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत खापरखेडा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. दीपकच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)