शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केरोसिनचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त होणार; २०% दरवाढीची शक्यता

By admin | Updated: May 28, 2015 23:47 IST

इंधनांचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करत बाजारातील दरांशी संलग्न केल्यानंतर आता सरकारने केरोसिनचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या दोन महत्त्वपूर्ण इंधनांचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करत बाजारातील दरांशी संलग्न केल्यानंतर आता सरकारने केरोसिनचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चालू वर्षातच केरोसिनचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करून बाजारातील दराशी संलग्न करण्याचे संकेत सरकारने दिले असून असे झाल्यास या दरात तातडीने किमान २० टक्क्यांची वाढ होईल.पेट्रोल आणि डिझेलवरील अनुदानाचा बोजा वाढल्यानंतर सरकारने या दोन्ही इंधनांचे दर बाजाराशी संलग्न केले. यामुळे या इंधनावर होणाऱ्या सरकारच्या खर्चात बचत झाली. बाजारातील किमतीच्या चढ-उताराचा फायदा ग्राहकांना मिळेल असा तर्कही दिला गेला. मात्र, अनुदान हटल्यापासून तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे दोन्ही इंधनाच्या प्रत्यक्ष किमतीमध्ये वाढच नोंदली गेली आहे. जून २०१० मध्ये सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केले आणि यानंतर गेल्या पाच वर्षात लिटरमागे पेट्रोलच्या दरात ३५ ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलच्या किमती गेल्यावर्षी नियंत्रणमुक्त झाल्या. यानंतर डिझेलच्या दरात प्रति लिटर १५ रुपयांपर्यंत वाढ नोंदली गेली. डिझेलच्या दराचा थेट संबंध हा महागाईशी असल्याने महागाईचा आलेखदेखील उंचावलेला दिसून आला. या दोन्ही महत्त्वपूर्ण इंधनानंतर आता सरकारने केरोसिनच्या दरांना मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे दर नियंत्रणातून मुक्त झाले तर याचा थेट फटका देशातील २० कोटीपेक्षा जास्त लोकांना बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचा नियंत्रणमुक्तीनंतरच्या दरांचा अनुभव बघितला तर केरोसिनच्या दरात किमान २० टक्के वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका अर्थविषयक इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरोसिनचे दर नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत दिले आहेत. याच मुलाखतीत तेलाच्या किमती आणि आयातीवर भाष्य करताना ते म्हणाले की, २०२२ पर्यंत भारताचा इंधन आयातीचा अवलंब १० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. (प्रतिनिधी)४देशाच्या आयातीत सर्वात मोठा वाटा तेल आयातीचा असून यामुळे चालू खात्यातील वित्तीय तूट वाढताना दिसते. गेल्यावर्षी याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती या प्रति बॅरल १४५ डॉलरच्या घरात होत्या.४गेल्या वर्षभराच्या कालावधीत या किमतीने प्रति बॅरल ४० डॉलरचा टप्पा गाठत नीचांक नोंदविला होता. यामुळे सरकारच्या आयात खर्चातही लक्षणीय बचत होताना वित्तीय तूटही आवाक्यात येत आहे.