शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Kerala Floods : राज्याकडून आणखी ३० टन सामग्री केरळला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:19 IST

स्वयंसेवी संस्थांचाही पुढाकार; वायुदलाच्या विमानाचा वापर

मुंबई : भीषण पुरात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ६.५ टन सामग्री पाठविल्यानंतर रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून आणखी ३० टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आणखी पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे.विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.केरळ भवनात २०० टन साहित्यनवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे २०० टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या २० व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.च्मुंबईहून नौदलाची ‘आयएनएस दीपक’ ही नौका कोचीनला पोहोचली आहे. ८ लाख लीटर पाणी, १३ हजार ५९२ किलो खाद्यान्न, ४८८ किलो धान्य, १२२८ किलो जेवणाची पाकिटे, ३४०० पाण्याच्या बाटल्या व ३१०० पाणी पिशव्या घेऊन टँकर श्रेणीतील हे जहाज रविवारी सायंकाळी कोचिनला पोहोचले.च्अहमदनगर येथील स्रेह ग्रुपच्या सदस्यांनी २०० ब्लँकेट पाठविले आहेत. तसेच युवान या सामाजिक संस्थेमार्फत व ‘आय लव्ह नगर’ या संस्थेच्या सहकार्यानेही पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेनेही पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfloodपूर