शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

केजरींच्या ‘त्या’ परिपत्रकाने खळबळ

By admin | Updated: May 10, 2015 23:58 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना लक्ष्य ठरवत जारी केलेले परिपत्रक सध्या वादाचा विषय बनले असून, सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

अधिका-यांना आदेश : बदनामीकारक बातम्यांची तक्रार करानवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना लक्ष्य ठरवत जारी केलेले परिपत्रक सध्या वादाचा विषय बनले असून, सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. केजरीवालांनी बदनामी करणारे कोणतेही वृत्त असल्यास त्याबाबत प्रधान सचिवांकडे तक्रार करा, तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित वृत्तपत्रे किंवा टीव्ही वाहिन्यांवर कारवाई केली जाईल, असा आदेश सरकारी अधिकाऱ्यांना जारी केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.प्रसिद्ध झालेली एखादी बातमी किंवा वृत्तवाहिन्यांवर प्रसारित वृत्तांमधून दिल्ली सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याला वाटत असेल तर गृह विभागाच्या सचिवांकडे तडकाफडकी तक्रार करावी, असे दिल्लीच्या माहिती आणि प्रसारण महासंचालनालयाने परिपत्रकात नमूद केले आहे. केजरीवाल ढोंगी व लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला आहे. सरकारवर टीका होत आहे. मीडियाकडून सरकारच्या चुका उघड्या पाडल्या जात आहेत म्हणून केजरीवालांनी आक्षेप घेणे लोकशाहीविरोधी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पी.सी. चाको यांनी दिली. केजरीवाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलत असून सर्वांचा गळा दाबू पाहत आहेत, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी स्पष्ट केले. केजरीवालांना एकीकडे अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, तर उर्वरित सर्वांचा गळा आवळायचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)हे ढोंगीपणाची सीमा ओलांडणे झाले, असे ते म्हणाले.परिपत्रकातील हुकूम असा आहे४दिल्ली सरकारमधील कोणत्याही अधिकाऱ्याला प्रकाशित किंवा प्रसारित वृत्तात सरकारच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली जात आहे असे वाटत असेल तर गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार दाखल करायची. ४वृत्तातील मजकूर तारीखवार सादर केल्यानंतर खटले महासंचालकांना ते वृत्त बदनामीकारक असल्याचे वाटत असेल तर कायदा विभागाकडे तपासणीसाठी पाठवले जाईल. त्यानंतर सीआरपीसी कलम १९९(४) अन्वये खटल्यासाठी मंजुरी मिळविली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर गृहमंत्रालय सीआरपीसी १९९(२) नुसार प्रकरण सरकारी वकिलांकडे पाठवेल.