शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांसाठी खडतर मार्ग?

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

केजरीवालांसाठी खडतर मार्ग?

केजरीवालांसाठी खडतर मार्ग?
भाजपचे दिल्लीतील खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांनी शपथविधी सोहळ्याकडे फिरविली पाठ

नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीतील सत्तेची धुरा हाती घेतली असली तरी दिल्लीच्या विकासाच्या दृष्टीने केजरीवाल सरकारसाठी पुढचा मार्ग मात्र तेवढा सोपा नाही.
शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करूनही ना पंतप्रधान आले, ना केंद्रीयमंत्री. दिल्लीतील भाजपचे खासदारही आले नाहीत. हे लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला असला तरी प्रत्यक्षात यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळविणे केजरीवाल यांना कठीणच जाईल, असे दिसते.
महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असल्याने पंतप्रधान शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे शक्य नव्हते. तथापि, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनीही अन्य कार्यक्रमाला प्राधान्य देत शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरविली. दिल्लीचा विकास आणि अन्य सरकारी कामकाजासाठी या दोन केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल सरकारला गरज भासणार आहे.
दिल्लीतील भाजपच्या सातही खासदारांना केजरीवाल यांनी अगत्याने शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. तेही रामलीला मैदानावर दिसले नाहीत. निमंत्रण उशिरा मिळाल्याने शपथविधी सोहळ्यात सहभागी होता आले नाही, अशी सबब दिल्लीतील एका खासदाराने सांगितली.
निवडणुकीत केजरीवाल यांनी बरीच आश्वासने दिली आहेत. नवीन इस्पितळ, महाविद्यालये सुरू करण्यासह दिल्लीवासीयांना हक्काची घरे देणे तसेच महिलांना सुरक्षा देण्याचा वायदा केजरीवाल यांनी केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी केजरीवाल सरकारला केंद्र सरकारची पदोपदी मदत लागेल. दिल्ली विकास प्राधिकरणामार्फत (डीडीए) घरे उभारली जाणार असून डीडीए केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाच्या, तर सुरक्षेचा मुद्दा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांच्या कक्षेत येतो.
सरकार चालविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य लागेल, असे केजरीवाल यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री आणि नागरी विकासमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर शिष्टाचार म्हणून भाजपच्या ७ खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते.
माकन आणि किरण बेदींचा सल्ला घेणार
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्या सल्ल्याने काम करणार असल्याचे सांगितले आहे. किरण बेदी यांना मोठी बहीण मानतो. आमचे सरकार आवश्यक तेथे त्यांचा सल्ला घेईल. कारण त्यांच्या पाठीशी दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. अजय माकन यांच्याशीही आम्ही सल्लामसलत करू. केंद्रीय मंत्री म्हणून योजना आखणे आणि त्या लागू करण्याचा त्यांना अनुभव आहे.
केजरीवाल यांच्या या वक्तव्याचे माकन आणि भाजपने स्वागत केले आहे.
सकारात्मक विधान करून केजरीवाल यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो, असे माकन म्हणाले.
केजरीवाल दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करतील. यासाठी सहकार्य केले जाईल, असे भाजप नेते श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले.