शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जगातील ५० महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांचा समावेश

By admin | Updated: March 25, 2016 12:02 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवाल यांचा 'जगभरातील ५० महान नेत्यांच्या' यादीत समावेश झाला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवाल यांचा 'जगभरातील ५० महान नेत्यांच्या' यादीत समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध 'फॉर्च्यून' मॅगिझनच्या या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मात्र या यादीत समावेश झालेला नाही. दिल्ली सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दलही मॅगझिनने केजरीवालांचे कौतुक केले आहे. 
खुद्द अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल ट्विट केले आहे. ' प्रथम वॉशिंग्टन पोस्टने आम आदमी क्लिनिक्सचे कौतुक केले, आणि आता आता फॉर्च्यून मासिकाने दिल्लीत राबवण्यात आलेल्या सम-विषम वाहतूक योजनेचे कौतुक केले आहे' असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नमूद केले आहे. 
दिल्ली सरकारने जानेवारी महिन्यात १५ दिवसांसाठी सम-विषम वाहतूक योजनेचा प्रयोग राबवला होता, जो यशस्वी ठरला. येत्या एप्रिल महिन्यात पुन्हा १५ दिवसांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
फॉर्च्युन मासिकाच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज हे अव्वल स्थानावर असून केजरीवाल ४२ व्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल दुस-या स्थानावर, म्यानमारमधील नेत्या आँग सान सू की (३), अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली (२२) आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडी  (४८) यांचाही या यादीत समावेश आहे.