शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांचा दिल्ली पोलिसांवर अविश्वास

By admin | Updated: January 20, 2016 03:18 IST

दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांवर अविश्वास दर्शवीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी दहा खासगी

नवी दिल्ली : दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांवर अविश्वास दर्शवीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संरक्षणासाठी दहा खासगी कमांडोंची तुकडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.दिल्ली पोलिसांनी आपल्याला सुरक्षा पुरवावी, असे केजरीवाल यांना अजिबात वाटत नाही, असे आप सरकारने म्हटले आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या विशेष सुरक्षा दलात लवकरच दहा धडधाकट तरुणांची भर्ती करण्याचा आप सरकारचा विचार आहे. लोकांनी केजरीवाल यांना सार्वजनिक स्थळी त्रास देण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या रविवारीच एका तरुणीने त्यांच्यावर शाई फेकली होती. केजरीवाल यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिल्ली सरकारच्या अंतर्गत असलेल्या मुलकी संरक्षण विभागातील दहा तरुण स्वयंसेवकांची भर्ती करण्याची सरकारची योजना आहे. केजरीवाल हे दिल्लीबाहेर जातील त्यावेळीही हे दहा कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. ‘दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी आम आदमी पार्टीचे स्वयंसेवक आहेत,’ असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)