शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या मुलीनेच ‘लाच’ देऊ केली तेव्हा...

By admin | Updated: May 18, 2015 02:52 IST

आम आदमी पार्टीची सत्ता येताच दिल्लीतील भ्रष्टाचार ७० ते ८० टक्के घटल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीची सत्ता येताच दिल्लीतील भ्रष्टाचार ७० ते ८० टक्के घटल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. माझ्या मुलीने एका अधिकाऱ्याला लाच देऊ केली पण ती घेण्यास तो अधिकारी धजावला नाही, असा एक किस्साही आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी सांगितला.जुन्या दिल्लीत बुराडी येथे आॅटोचालकांना संबोधित करताना केजरीवाल यांनी हा किस्सा ऐकवला. ते म्हणाले की, माझी मुलगी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना काढण्यासाठी संबंधित विभागात गेली. एक सामान्य मुलगी या नात्याने ती गेली आणि रांगेत उभी झाली. आपली ओळख जाहीर न करता, एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आपण आणला नसल्याचे तिने संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले; पण आवश्यक कागदपत्रे नसतील तर परवाना बनणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने तिला निक्षून सांगितले. यानंतर माझ्या मुलीने त्या अधिकाऱ्यास पैसे देण्याची तयारी दाखवली. तिने पैसे देण्याची तयारी दाखवताच, त्या अधिकाऱ्याने तिच्या फोनकडे बघितले. व्हिडिओ शूटिंग तर करीत नाही ना, याची खातरजमा त्याने केली. माझ्या मुलीने तात्काळ परवाना हवा असल्याचे कारण सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)