ुवृत्तपत्रातील जाहिरातीबाबत केजरीवाल यांची भाजपावर टीका
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे.
ुवृत्तपत्रातील जाहिरातीबाबत केजरीवाल यांची भाजपावर टीका
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीकरिता भाजपावर टीका केली आहे. या जाहिरातीत अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्रावर पुष्पमाला घातल्याचे दाखविले गेले आहे. सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर केजरीवाल यांनी, आजच्या दिवशी १९४८ मध्ये नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली होती व आज या जाहिरातीद्वारे अण्णा हजारे यांची हत्या करण्यात आली असे म्हटले आहे. याकरिता भाजपाने माफी मागायला नको काय असा प्रश्नही विचारला आहे. या जाहिरातीत केजरीवालांचेही व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्यात ते काँग्रेसकडून समर्थन न घेण्याचे आश्वासन देताना व पुढे त्यांना काँग्रेससोबत युती करताना दाखविले आहेत. अन्य एका नोंदीत त्यांनी, आपल्या समर्थकांना सचेत राहण्याचे आवाहन केले आहे. वाईट प्रवृत्ती तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील मात्र दिल्लीकरिता सकारात्मक बाबींवरच लक्ष केंद्रीत असू द्यावे असे त्यात म्हटले आहे.अन्य एका नोंदीत, आप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे व दिल्लीची सेवा करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीला आराम पडो असेही त्यात नमूद आहे. केजरीवाल यांचे टिष्ट्वटरवर ३३ लाख वाचक आहेत.