शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

By admin | Updated: January 21, 2015 13:21 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अरविंद केजरीवाल तसेच किरण बेदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून आप व भाजपामध्ये प्रमुख लढत पहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल तसेच भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला, यावेळी भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर किरण बेदी कृष्णानगरमधून ही निवडणूक लढवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून अजय माकन यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरला असून ते सदर बाजार येथून निवडणूक लढवत आहेत. 
अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची सोमवारी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. चर्चेपेक्षा कृती करण्यात आपल्याला जास्त रस आहे, असे किरण बेदींनी म्हटले होते. तर आपला लढा हा कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून भ्रष्टाचार व महागाईविरोधात आहे. ज्याप्रमाणे दिल्लीतील जनतेने गेल्या निवडणुकीत आमच्यावर विश्वास ठेवला, तसाच तो यावेळीही ठेवावा असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. किरण बेदी आणि केजरीवाल हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका काँग्रेस नेते अजय माकन यांनी केली आहे.  
दरम्यान मतदारांना पक्षांकडून पैसे घेण्याचे आवाहन करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून आज त्या नोटीशीला उत्तर देण्याचा अखेरचा दिवस आहे.