शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूजा बंद ठेऊन केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला वाहिली श्रध्दांजली

By admin | Updated: February 5, 2016 11:47 IST

केरळमधल्या एका मंदिराने २३ वर्षीय मुस्लिम युवकाच्या मृत्यूबद्दल दोन दिवस मंदिरातील पूजा बंद ठेऊन दुखवटा व्यक्त केला.

 ऑनलाइन लोकमत 

तिरुअनंतपूरम, दि. ५ -  केरळमधल्या एका मंदिराने २३ वर्षीय मुस्लिम युवकाच्या मृत्यूबद्दल दोन दिवस मंदिरातील पूजा बंद ठेऊन दुखवटा व्यक्त केला. केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला अशा प्रकारे श्रध्दांजली वाहण्याची ही दुर्मिळ घटना आहे. एम.व्ही.शब्बीर असे या युवकाचे नाव आहे. मागच्यावर्षी पूजेदरम्यान घडलेल्या एका घटनेवरुन रविवारी दुपारी चौघांनी शब्बीरला बेदम मारहाण केली होती. त्यात शब्बीरचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ चित्रीत केला होता. 
यासंबंधी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिरुअनंतपूरम जिल्ह्यात पुथेनाडा येथील शिव मंदिरात उत्सव आयोजित केला जातो. शब्बीर या उत्सव आयोजित करणा-या समितीचा सदस्य होता. सोमवारी आणि मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांनी शब्बीरच्या सन्मानार्थ शंख आणि घंटानाद न करण्याचा निर्णय घेतला. 
या शिव मंदिरात दिवसाला पाच पूजा होतात. पण सोमवारी आणि मंगळवारी सकाळच्या दर्शनानंतर मंदिरात शंख आणि घंटानाद झाला नाही. ही धर्मापलीकडची मैत्री आहे. मंदिर समितीमध्ये असलेल्या शब्बीरला आम्ही कधीही मुस्लिम समजले नाही असे मंदिर महोत्सव समितीचे सदस्य असलेल्या एन.उन्नी यांनी सांगितले.