मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या! राजदचे पप्पू यादव धावले मदतीला
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या!
मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या! राजदचे पप्पू यादव धावले मदतीला
मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या!राजदचे पप्पू यादव धावले मदतीलानवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू नका, त्यांना मुख्यमंत्री म्हणूनच राहू द्या, असे राजदचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी म्हटले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मांझींना हटविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी बोलावलेली बैठक अवैध आणि घटनाबाह्य होती, हे पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे यादव म्हणाले. उच्च न्यायालयाने बुधवारी नितीशकुमार यांच्या निवडीला स्थगिती दिली, हे येथे उल्लेखनीय.आपल्याला सांप्रदायिकतेविरुद्ध लढायचे असेल तर सामाजिक न्यायाच्या विचारसरणीला कमजोर करून चालणार नाही. बिहारमध्ये सामान्य माणसाला नायक म्हणून सादर करणे गरजेचे आहे, असे पप्पू यादव म्हणाले.आमदारांना बंदी बनविल्याचा पासवान यांचा आरोपदरम्यान जदयू आमदारांना उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे बंदी बनविण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि लोजपा अध्यक्ष रामविलास पासवान यांनी केला आहे. मांझी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी या बंदी आमदारांची सुटका केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.मांझींना पाठिंब्याचा निर्णय विधानसभेत घेऊ-भाजपबिहारमधील राजकीय परिस्थिती हा जदयूचा अंतर्गत मामला आहे. त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय विधानसभेत घेतला जाईल, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.या परिस्थितीसाठी नितीशकुमार जबाबदार आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांच्यातील सत्तापिपासा वाढली आहे, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी केला. (वृत्तसंस्था)