शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गोल बाजारातील अतिक्रमण काढले काटोल नगर परिषदेची कारवाई : गाळ्यासमोरील १० फूट जागा मोकळी

By admin | Updated: October 21, 2016 00:18 IST

काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली.

काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली.
शहरातील गोल बाजारातील गाळ्यासमोर काहींनी टिनपत्र्यांचे शेड उभारून अतिक्रमण केले होते. त्यामुळे दुकानदारांसोबतच नागरिकांनाही या अतिक्रमणाचा त्रास व्हायचा. हा त्रास वाढल्याने नागरिकांनी सदर अतिक्रमण संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करून सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्याची सूचना केली होती. त्यासाठी संबंधितांना पुरेसा अवधीही देण्यात आला होता.
या नोटीसची दखल घेत काही दुकानदारांनी त्यांची दुकाने हटविली. परंतु, शास्त्री चौक व जयस्वाल संकुल परिसरातील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण काढायला सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ७० दुकानांसमोरील अतिक्रमण काढण्यात आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस चालणार आहे. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिवाय, पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे दुकानदारांसोबतच ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
***