काटोल....
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
तंबाखू सोडण्याचा संकल्प करा
काटोल....
तंबाखू सोडण्याचा संकल्प करादीपक सावंत : काटोल येथे शिवजयंती उत्सवकाटोल : विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापूस व इतर प्रश्नांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देतानाच प्रत्येकांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प करा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. स्थानिक तालुका क्रीडा संकुल येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, आ.डॉ. आशिष देशमुख, जि.प. सभापती उकेश चौहान, किरण पांडव, माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, सतीश हरडे, राजू हरणे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले, राज्यात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी अनेकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. त्यामुळे तंबाखूवर बंदी घातली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प करावा, असेही ते म्हणाले. तीन महिन्यात काटोल येथील ट्रामा केअर व तेथील डॉक्टरांचे प्रश्न सोडविले जाईल; तसेच १०८ क्रमांकावर उपलब्ध होणारी रुग्णवाहिका सेवा आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही डॉ. दीपक सावंत यांनी याप्रसंगी दिले. यावेळी आ.डॉ. आशिष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक नगरसेवक समीर उमप यांनी केले. संचालन राजीव कोतेवार यांनी तर आभार मनोज खळतकर यांनी मानले. शिवजयंती उत्सवानिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली. उत्सवात मराठा सेवा संघ, एकता स्पोर्टिंग क्लब, मराठा लान्सर्स, जिजाऊ ब्रिगेड, हनुमान व्यायाम शाळा आदी विविध १८ संघटनांनी सहभाग घेतला होता.