शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कथ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी

By admin | Updated: October 6, 2015 00:21 IST

कथ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी

कथ्थक नृत्य, तबल्याची रंगली जुगलबंदी
-बारावा बहुभाषीय नाट्य महोत्सव
(फोटो हार्ड कॉपीमध्ये आहे ..कॅप्शन..आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांचा सत्कार करताना विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश शर्मा, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, मधुप पांडेय, समाजसेवक उमेश चौबे व इतर मान्यवर.)

नागपूर : ललिता कुंडू यांचे कथ्थक नृत्य व आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांच्या तबलावादनाच्या जुगलबंदीने बारावा बहुभाषीय नाट्य महोत्सव रंगला. कला सागर नागपूरद्वारा या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुरेश शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाचे कार्यकारी प्रधानमंत्री मधुप पांडेय, कलासागरचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे उपस्थित हेाते.
सीताबर्डी येथील श्री रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित या पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात शिववंदनेने झाली. दिल्ली येथील ललिता कुंडू यांच्या कथ्थक नृत्यावर आचार्य पं. प्रशांत गायकवाड यांच्या तबल्याची जुगलबंदी आकर्षण ठरले. यात उठाण, तोडे, गत, चक्रदार, तिहायी, नवका तिहायी आणि सवाल-जवाबद्वारे जुगलबंदीवर रसिकांनी भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुंडू व पं. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. अकोला येथील प्रा. डॉ.पी. आर. सुपळकर यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.