शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

काश्मीरमध्ये तरुणांनी फडकावले इसिसचे झेंडे, बु-हान वाणीचे पोस्टर

By admin | Updated: May 1, 2017 16:54 IST

काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काही फुटीरतावाद्यांच्या नादी लागून तरुणांनी इसिस आणि बु-हान वाणीचे पोस्टर झळकावले आहेत.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 1- काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काही फुटीरतावाद्यांच्या नादी लागून तरुणांनी इसिस आणि बु-हान वाणीचे पोस्टर झळकावले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी हे इसिसचे झेंडे झळकावले आहेत. विद्यार्थ्यांनी लावलेले पोस्टर हटवण्यासाठी गेलेल्या जवानांवरही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. शनिवारी विद्यार्थ्यांनी श्रीनगरमधील गोजगी बाग परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी जवानांविरोधातच आंदोलन केले होते. घटनास्थळी पोलीस आले असता त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केला असून, त्यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पुलवामातील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी जवानांविरोधातच मोर्चा काढला. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत इसिसचे झेंडेही फडकावले. काहींनी दहशतवादी बु-हान वाणीचे पोस्टरही लावले. जवानांनी विद्यार्थ्यांना पोस्टर हटवण्यास सांगितले असता, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या घोषणा देत जवानांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यातील तरुणांची माथी भडकावून अशांतता पसरवण्याचं काम फुटीरतावादी नेते आणि सीमेपलीकडून होत आहेत. त्यामुळे काश्मीर कायम धुमसतं आहे.