शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर हादरले !

By admin | Updated: February 21, 2016 01:29 IST

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवान शहीद आणि १

श्रीनगर : श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ जवान शहीद आणि १ नागरिक ठार झाला. तसेच १० जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला केल्यावर दहशतवादी जवळच्याच एका सरकारी इमारतीत घुसले असून, सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत धुमश्चक्री सुरू होती. दहशतवाद्यांनी नागरिकांना वेठीस धरू नये म्हणून सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात असणाऱ्या पम्पोर येथील उद्योजकता विकास संस्थान (ईडीआय) इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. इमारतीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक राजेंद्र यांनी सांगितले. तेथून जवळच असलेल्या इमारतीत असलेल्या अनेक नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी इमारतीत घुसताना आम्हाला बाहेर निघून जाण्यास सांगितले; कारण त्यांचा नागरिकांना नुकसान पोहोचविण्याचा हेतू नव्हता, असा दावा या इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या एकाने केला. भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित १५ कोरचे मुख्यालय हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करणाऱ्या सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराच्या जवानांना पाठविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)दहशतवाद्यांची संख्या तीन ते पाच - प्रत्यक्षदर्र्शींच्या मते दहशतवाद्यांची संख्या तीन ते पाच आहे. या हल्ल्यात एक नागरिकही जखमी झाला असून, सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.घटनास्थळी सातत्याने गोळीबार केला जात असून, सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या इमारतीला वेढा घातला आहे. अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे.