शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर पोलीस हत्या प्रकरण, आणखी तिघांना अटक

By admin | Updated: June 24, 2017 13:11 IST

श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने ठेचून मारुन हत्या केल्याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 -  मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने ठेचून मारुन हत्या केल्याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद आयुब पंडित असे हत्या करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. यावेळी त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. 
 
पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी सांगितले की, या प्रकरणी आम्ही 12 जणांची ओळख पटवली असून एकूण पाच जणांना अट केली आहे. याआधी शुक्रवारी दोन जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये पंडित यांचा मृत्यू झाला. जमावाने पोलीस चौकीही उद्धवस्त केली. यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही वैद यांनी दिला.
 
मोहम्मद आयुब पंडित हे श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. ते अनेक काळापासून तिथे बंदोबस्तासाठी असल्याने मशिदीत नियमित जाणारे त्यांना ओळखत असत. त्या भागातील पोलीस नेहमीच साध्या वेशात असतात. गुरुवारी रात्री जामिया मशिदीमध्ये ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. त्यासाठी तिथे शेकडो लोक जमले होते. त्यातील काहींना पंडित यांच्याविषयी शंका आली व त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून तणाव वाढत गेला.
 
जमाव वाढत गेला आणि त्याला पांगवण्यासाठी पंडित यांनी गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी या अधिकाऱ्याचे कपडे काढले आणि त्यास मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र फुटिरवाद्यांनी माथी भडकवल्याने अशी घटना घडल्याचा संशय असून, फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मिरवाइज हा तेव्हा मशिदीत होता अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मिरवाइजनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
 
नेमका हल्ला का झाला?
काहींच्या म्हणण्यानुसार नमाज सुरू असताना पंडित मशिदीचा फोटो काढत होते. त्यामुळे जमावाचा गैरसमज झाला आणि तो पंडित यांच्या अंगावर धावून आला. स्वसंरक्षणासाठी या अधिकाऱ्याने गोळीबार केला, ज्यात तीन जण जखमी झाले.
 
बंदोबस्त वाढवला
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. भाकप तसेच जम्मू-काश्मीर काँग्रेसनेही घटनेचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण श्रीनगर शहरात आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.
 
जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका
ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच चालू राहिले, तर जसे आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. जवानांच्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नका, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.