शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पोलिसाला जमावाने ठेचून ठार मारले

By admin | Updated: June 24, 2017 04:33 IST

गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी

श्रीनगर : गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी शुक्रवारी कळस गाठला. मशिदीबाहेर सुरक्षेसाठी असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यालाच जमावाने ठेचून मारल्याची धक्कादायक घटना श्रीनगर शहरात घडली. या घटनेने संतापाची लाट उमटली असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.मोहम्मद आयुब पंडित असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. श्रीनगरमधील नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर ते बंदोबस्तासाठी होते. ते अनेक काळापासून तिथे बंदोबस्तासाठी असल्याने मशिदीत नियमित जाणारे त्यांना ओळखत असत. त्या भागातील पोलीस नेहमीच साध्या वेशात असतात. गुरुवारी रात्री जामिया मशिदीमध्ये ‘शब-ए-कद्र’ची प्रार्थना सुरू होती. त्यासाठी तिथे शेकडो लोक जमले होते. त्यातील काहींना पंडित यांच्याविषयी शंका आली व त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातून तणाव वाढत गेला. जमाव वाढत गेला आणि त्याला पांगवण्यासाठी पंडित यांनी गोळीबार केला. त्यात तीन जण जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी या अधिकाऱ्याचे कपडे काढले आणि त्यास मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र फुटिरवाद्यांनी माथी भडकवल्याने अशी घटना घडल्याचा संशय असून, फुटिरवादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मिरवाइज हा तेव्हा मशिदीत होता अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मिरवाइजनेही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, ह्यजमावाने केलेल्या मारहाणीमध्ये पंडित यांचा मृत्यु झाला. जमावाने पोलीस चौकीही उद्ध्वस्त केली.ह्ण यात सहभागी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही वैद यांनी दिला.नेमका हल्ला का झाला?काहींच्या म्हणण्यानुसार नमाज सुरू असताना पंडित मशिदीचा फोटो काढत होते. त्यामुळे जमावाचा गैरसमज झाला आणि तो पंडित यांच्या अंगावर धावून आला. स्वसंरक्षणासाठी या अधिकाऱ्याने गोळीबार केला, ज्यात तीन जण जखमी झाले.बंदोबस्त वाढविलामाजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. भाकप तसेच जम्मू-काश्मीर काँग्रेसनेही घटनेचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण श्रीनगर शहरात आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच चालू राहिले, तर जसे आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. जवानांच्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नका, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला.