शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

काश्मीरचे राज्यपाल बदलणार?

By admin | Updated: August 29, 2016 02:42 IST

गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या २५ आॅगस्टच्या काश्मीर दौऱ्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांना बदलण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीगृहमंत्री राजनाथसिंह यांच्या २५ आॅगस्टच्या काश्मीर दौऱ्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांना बदलण्याची तयारी चालवल्याची माहिती सूत्रांनी दिली. काश्मीरमधे अजूनही तणावाची स्थिती आहे. ८ जुलैपासून व्यापार, व्यवसाय, कार्यालये, दुकाने, शाळा सारेकाही ठप्प आहे. रविवारी राज्यात कर्फ्युचा ५१वा दिवस होता. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सलग ५१ दिवस संचारबंदी लागू असल्याचे बहुधा हे पहिलेच उदाहरण असावे. वोहरा यांच्या जागेवर राज्यपाल पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडुरी, माजी गृहसचिव अनिल बैजल, निवृत्त लेफ्टनंट जनरल सैयद अता हसेनन व निवृत्त जनरल वेदप्रकाश मलिक, मिझोरमचे माजी राज्यपाल अमोलक रतन कोहली व दिल्लीचे माजी उपराज्यपाल विजय कपूर अशी ६ नावे नावे चर्चेत आहेत. कोण आहेत वोहरा?राज्यपाल एन.एन. वोहरा माजी नोकरशहा आहेत. १९९७ ते १९९८ या काळात ते पंतप्रधानांचे मुख्य सचिव होते. २00७ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी राज्यपाल जगमोहन व विद्यमान राज्यपाल वोहरा यांच्या कारकिर्दीच्या अगोदर सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडेच जम्मू काश्मीरचे राज्यपालपद सोपवले जात असे. १९८९ साली काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचा प्रारंभ झाला. त्यानंतर २00८ साली एन.एन. वोहरांच्या हाती राज्यपालपदाची सूत्रे सोपवण्यात आली. २0१३ साली दुसऱ्या कार्यकालासाठी केंद्र सरकारने त्यांची पुनर्नियुक्ती केली. बुऱ्हाण वाणीच्या वडिलांनी रविशंकर यांच्याशी केली चर्चा १ सुरक्षा दलाशी चकमकीत मारला गेलेला हिज्बुलचा अतिरेकी बुऱ्हाण वाणी याचे वडील मुजफ्फर वाणी यांनी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्याशी बंगळुरूस्थित आश्रमात चर्चा केली. मुजफ्फर वाणी यांनी फोनवरून वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गत आठवड्यात आपण बंगळुरूत खासगी कामानिमित्त गेलो होतो. या वेळी श्री श्री रविशंकर यांच्याशी चर्चा केली. श्री श्री रविशंकर हे शांतिपुरुष आहेत. त्यांना आपण काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. वाणी असेही म्हणाले की, आपण श्री श्री रविशंकर यांना या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आपल्या प्रभावाचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे. २ श्री श्री रविशंकर यांनी मला विचारले की, काश्मीरच्या जनतेला काय हवे आहे? त्यावर आपण त्यांना काश्मिरात येऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आवाहन केले, असेही वाणी म्हणाले. शिक्षक असलेल्या वाणी यांनी सांगितले की, काश्मीरप्रश्नी दीर्घकालीन तोडगा काढण्यास फुटीरवाद्यांसोबत विनाअट चर्चा व्हायला हवी. हुर्रियत हे काश्मीरचे नेतृत्व आहे आणि त्यांच्याशी विनाअट चर्चा व्हायला हवी.