शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर सरकारची घोषणा होणार पुढील आठवड्यात?

By admin | Updated: February 21, 2015 03:52 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात पीडीपी-भाजप युती सरकारची घोषणा होऊ शकते. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा काळजीपूर्वक तयार करण्यात आला

श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुढील आठवड्यात पीडीपी-भाजप युती सरकारची घोषणा होऊ शकते. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून त्यात कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यासह सर्व वादग्रस्त मुद्यांवर तोडगा शोधण्यात आला आहे. रा.स्व. संघाने कलम ३७० हटविण्याची मागणी लावून धरल्याने अडसर निर्माण झाला होता, मात्र नव्याने कोणताही अडथळा आलेला नाही, असे भाजप सूत्रांनी स्पष्ट केले.पीडीपीचे मुख्य आधारस्तंभ असलेले मुफ्ती मोहंमद सईद हे सहा वर्षांसाठी मुख्यमंत्री बनतील. त्यांनी राज्याशी संबंधित कोणत्याही मुद्यावर विकलो जाणार नाही असे सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केली; मात्र त्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सडेतोड आरोप केला आहे. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची बाजू घेणारा पीडीपी हा पक्ष विकला गेला आहे. त्यामुळे ‘डिअर मुफ्तीसाहेब’ तुम्ही विकलो जाणार नाही अशी भाषा करू नका, असे ओमर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.जम्मू-काश्मीरच्या ८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीकडे २८, तर भाजपकडे २५ आमदार आहेत. २३ डिसेंबर रोजी त्रिशंकू विधानसभेचा कौल मिळाल्यानंतर गेल्या सात आठवड्यांपासून या राज्यात राज्यपाल राजवट असून सरकार स्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा कोणत्या ठिकाणी मागे घेतला जाऊ शकतो याबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. कलम ३७० बाबत पीडीपीने मागितलेले लेखी आश्वासन भाजपने दिलेले नाही. प. पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांची २५ हजार कुटुंबे भारतात वास्तव्याला असून त्याबाबत मानवतावादी विचार केला जावा, असे पीडीपीला वाटते.संभाव्य खातेवाटपपीडीपी- गृह, अर्थ आणि अन्य काही महत्त्वाची खाती.भाजप- पर्यटन, जलसंसाधन, सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी आणि नियोजन.